Thursday, August 19, 2010

सगळं होणार, सगळं होणार,

सगळं होणार, सगळं होणार, आता आपलं सरकार आलंय
सगळं होणार..... ।।

आता शेतमालाला बाजार मिळणार,

तुरडाळ १५० रु., तर साखर १०० रु. किलो होणार,
दलाल मालामाल अन् शेतकरी भुकेकंगाल होणार ।।

आता दोन्ही ऊर्जामंत्री निवडून आलेत
१० वर्षांत जे करता आले नाही ते २ वर्षांत करणार,
दिवसभर वीज जाणार, रात्रीचीच काही तासच रहाणार ।।
रस्त्याला आता हातभर खड्डे पडणार,
मतदारांचे मणके ढिले होणार,
ठेकेदारांचे मात्र खिसे भरणार ।।


इंग्रजी अंगणवाडीपासून,
आणि मायमराठी नष्ट होणार ।।



प्रज्ञासिंहला फाशी होणार, कसाब सरकारचा जावई होणार,

अतिरेक्यांना पेन्शन मिळणार
पोलीस मात्र नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडणार ll


आता अतिरेक्यांनाच मुंबईवर हल्ला करण्याचे परवाने देणार,
सामान्य किडामुंगीसारखी मरणार,
महाराष्ट्रासारख्या मोठ्या मोठ्या राज्यांत अशा छोट्या छोट्या गोष्टी नेहमीच घडणार ll

मराठी माणूस दिल्ली दरबारी स्वाभिमान गहाण टाकणार,
मुजरा करून सरदारक्या मिळवणार
अन् स्वाभिमानी शिवरायांना महाराष्ट्रापासून दूर सिंधू सागरात बसवणार ।।

आता दहावी नापास अकरावीत जाणार,
बारावी नापास डॉक्टर, इंजिनीअर होणार,
माणसं मारणार, पूल कोसळणार ।।


आता खून करणारे गृहमंत्री होणार,
हरणं मारणारे वनमंत्री होणार,
काहीच न करणारा मुख्यमंत्री होणार
सगळं होणार, सगळं होणार,
आता आपलं सरकार आलंय, सगळं होणार ।।

चार पावलं आपण

चार पावलं आपण
सोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूर
कुठवर जुळतात पाहु...

अर्थात जमत असेल तर चल
मी आग्रह करणार नाही
आज तरी, "तुला यावच लागेल,
असा हट्ट ही धरणार नाही

पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा
व्यक्‍त करणं बरं असतं
कारण इथून तिथून ऐकलेलं
सारंच काही खरं नसतं

कुणी कुणाला का आवडावं
हे सांगता येत नाही
चार चौघांना विचारून कुणी
हृदय देत नाही

तसंच काहीसं माझं झालं
त्याच धुंदीत propose केलं
जवळ अशी कधी नव्हतीसंच
propose ने आणखीच दूर नेलं

जे झालं ते वाईट झालं
पण झालं ते बरंच झालं
खरं सांगणं गुन्हा असतो
एव्हढं मात्र लक्षात आलं

जाऊ दे,
झालं गेलं विसरून जा
मागे न वळता चालत राहा
मला विसर असं मी म्हणणार नाही
पण तू तो प्रयत्न करून पाहा...

थांब...
इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय
पण धन्यवाद; तू इथवर आलीस...
सारं आयुष्य नसलीस तरी
चार पावलं माझी झालीस....

टीप्का

टीप्का
रडू नकोस मी नाही तिथे आता तुझे आश्रू पुसायला, संभाळ त्याना आणि स्वताहाला.
गावा बाहेरची पायवाट पकडून डोंगरावर ए धावत, रुमलची कडा डोळ्याना लावून नजर फेक क्षिटिजा पर्यन्त.
सतत हालणारा टीप्का, दिसेल तुला, ओळख बघू कोण तो......
मीच, होय मीच तो, शिणलेला चिडलेला अस्वस्थ तुझी वाट बघून एकटा वाढलेला.
मला नवते माहीत तू बसली आसाशील आश्रू धळत गुडघ्यात मान घालून
तुझया कड्चा वारा सल्सल्त आला, आणि मला तुझया आश्रुंचा ओलावा जाणवला.
आणि म्हणूनच तर मी तुला, ईथे बोलावले. मी तर नाही येऊ शकत ना तिकडे.
तूच ए ना त्यापर....
मग आता का राडतेस,ठीक आहे मी ही ईतेच थाम्बेन असाच टीप्का बनून शिणलेला चिडलेला आणि अस्वस्थ.
अरे हो तुला आता लागेल सोबत कुणाची तरी परत जाताना गावात, ती चदणी बघटेस ना तिलाच घेऊन जा.
घाबरू नकोस तू नसताना तीच असते माझा स्वर, हो पण परत पाठव तिला , पाठवच कारण की तिच्यातच बघतो नेहमी मि तुला...
नाहीतर पुन्हा रात्र भर मला ई थेच राहावे लागेल थांबून, असाच शिणलेला चिडलेला आणि अस्वस्थ टीप्का बनून...